मुरुडेश्वर:
कर्नाटक हे वेगवेगळ्या गोष्टीं साठी प्रसिद्ध आहे आणि इथले प्रत्येक स्थान हे आपले वैशिष्ट्य दाखवत दिमाखाने उभे आहे.
तुम्ही कर्नाटकात प्रवेश केल्यावरती उत्तर कर्नाटक पासून तर दक्षिण कर्नाटका पर्यंत अनेक जागा ह्या पर्यटकांना बोलावत असतात. यातील एक सुंदर जागा म्हणजे मुरुडेश्वर ! मुरुडेश्ववर अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. इथे अनेक पर्यटक आणि भाविक इथल्या मंदिराच्या दर्शनाला येतात. मुरुडेश्वर हे मुंबई – मंगलोर नॅशनल हाय वे वरती स्थित आहे.भटकळ या तालुका ठिकण्या पासून 13 किमी वसलेले हे मुरुडेश्वर, बंगलोर पासून 490 किमी आहे.
153 किमी वर असलेले मंगलोर हे सगळ्यात जवळचे विमानतळ तर मुरुडेश्वर ला रेल्वे स्टेशन सुद्धा आहे जिथे कारवार वरून येणाऱ्या काही रेल्वे थांबतात. जगातल्या उंचीने दुसऱ्या क्रमांकाच्या शंकराच्या मूर्ती साठी मुरुडेश्वर प्रसिद्ध आहे.123 फुटाची शंकराची मूर्ती ही सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. इथले मंदिरातले गोपुर ही 21 मजली मोठी ईमारतच आहे. 237 फुटी गोपुर हे जगातील सर्वात मोठे गोपुर मानले जाते. ह्याला राजागोपुर म्हणतात.
येथील गोपुराचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या गोपुरात लिफ्ट ने सगळ्यात वर पर्यंत जाता येते आणि तेथून तिन्ही बाजु ने पसरलेला अथांग अरबी समुद्र आणि भव्य शिवाची मूर्ती ह्याचे दृश्य तेथून अनुभवता येते. ह्या मागची कथा तर सर्वश्रुत आहे,रावणाने तपश्चर्या करून भगवान शंकराकडून आत्मलिंग घेतले आणि लंके कडे निघाला.लिंग कुठेही खालती ठेवायचे नाही या अटी वरती शिवा ने ते लिंग रावणाला दिले होते आणि तसे केल्यास रावण अमर बनणार होता.पण भगवान विष्णूने सूर्यप्रकाश काढून घेऊन संध्याकाळची निर्मिती केली,ज्या मुळे रावणाला संध्याकाळचे विधी करण्या करिता कोणाला तरी ते शिवलिंग हातात देणे आवश्यक होते. त्याच वेळेला त्याला एक ब्राह्मण मुलगा दिसला. तेव्हा रावणाने त्याला ते शिवलिंग हातात पकडण्या साठी सांगितले. रावणाचे सायंकाळचे विधी होईस्तोवर त्या ब्राह्मणाने शिवलिंग जमिनिवरती ठेवले होते. तो ब्राम्हण मुलगा आणखी कोणी नाही साक्षात भगवान गणपती होते.
हे लिंग खाली ठेवलेले पाहून रावणाला अति क्रोध आला, व त्याने त्या लिंगाला उचलण्याचे प्रयत्न केले,पण जेव्हा ते जमले नाही तेव्हा त्या लिंगाचे काही अवशेष त्याच्या हातात आले…
ते त्यांनी जेव्हा तिथे फेकले त्याचे ,लिंगाच्या वरच्या वस्त्र आणि त्याचा काही भाग हा डेश्वर ला पोहचला.जे म्रीदेश्वर ला जाऊन पडले…त्याचेच कालांतराने मुरुडेश्वर असें नामांकन झाले.
कंदुका गिरीवर स्थित असलेला ही शिवाची मूर्ती फारच सुंदर आहे..मुरुडेश्वर गाव, त्यानंतर बीच आणि त्याच्या पुढे तेथे असलेले मंदिर आणि त्यापुढील मूर्ती हे सगळेच पाहणे फार विलोभनीय ठरते!
येथे RNS नावाचे हॉटेल आहे जे या खडकावर असून याच्या प्रत्येक भागातून समुद्राचे दर्शन होते.
ईदागुंजी नावाचे महागणपती मंदिर येथून जवळ आहे.
कारवार मार्गावर पुढे मरावंथे नावाचे गाव आहे जिथे एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला नदी आणि दोन्हीच्या मधून राष्ट्रीय महामार्ग जातो…हा निसर्गाचा चमत्कार डोळ्यांचे पारणे फेडतो..
जर नसेल गेलात अजून मुरुडेश्वर ला तर पुढची ट्रिप नक्की प्लॅन करा…एका अदभूत अनुभवासाठी!
सोबतचे फोटो हे मुरुडेश्वर, मरावंथे आणि तेथील अरबी समुद्राचे आहेत.