Healthy Mind Consultancy | Motivational Speakers in PuneHealthy Mind Consultancy | Motivational Speakers in PuneHealthy Mind Consultancy | Motivational Speakers in Pune
(Monday - Sat)
creatinghealthyminds@gmail.com
Healthy Mind Consultancy | Motivational Speakers in PuneHealthy Mind Consultancy | Motivational Speakers in PuneHealthy Mind Consultancy | Motivational Speakers in Pune

माणूसशास्त्र

माणूसशास्त्र
माणूसशास्त्र

माणूस ओळखणे हा एक अत्यंत इंटरेस्टिंग विषय! एक खूप छान, तितकाच कुतूहल वाटत असलेला आणि कदाचित दुर्लक्षित विषय! वास्तविक पाहता याचा अर्थ होतो तुमच्या मनाची प्रवृत्ती! माझ्या आजवरच्या सगळ्या लेखात मी हेच सांगितलं आहे की, मनुष्य जीवनाचं केंद्रस्थान हे त्याचं ‘मन’ हेच आहे. जे त्याला चांगलं, वाईट, योग्य, अयोग्य आणि इतर कुठल्याही भावनांचं, परिस्थितीचे आणि परत्वे कृतीची जाणीव करून देते. आपण बरेचदा म्हणतो की माझं एक मन म्हणत की हे कर आणि दुसरं म्हणत की नको करुस पण हे सत्य आहे.

तुम्ही कॉन्शस माईंड, सबकॉन्शस माईंड हे शब्द ऐकले आहेत. जागृत मन जे अलर्ट असते आणि सुप्त मन जे सतत विचारात असते मग तुम्ही जागे असा अथवा झोपेत, ते सतत कार्यरत असते. खरं तर प्रत्येक मनुष्य असो अथवा प्राणी त्याला मन आलंच पण आपल्या मनुष्य जातीच्या मनालाच प्राधान्य! आपण आपले पाय दुखले, पोट दुखले, डोळे दुखले त्या सगळ्याला महत्त्व देतो पण मनाला नाही. कोणत्याही डॉक्टर कडे जाणे अगदी सामान्य वाटते पण मनाच्या डॉक्टरचे नाव घ्यायला सुद्धा कमीपणा वाटतो. का? मनाइतके महत्वाचं असे दुसरं काहीच नाही खरं तर! काळरण सगळ्या शरीराची गुरुकिल्ली ही मन आहे. आता एक बघा, आपल्याला काहीही त्रास होत असो पण जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर जाणीव कमी होते पण तेच जर माझं दुखते असे म्हणत त्याला प्राधान्य दिलं तर त्रास हा खूप जास्ती प्रमाणात जाणवतो.

माणूसशास्त्रआपण म्हणतो “अरे जरा दुर्लक्ष करून बघ, मन गुंतव कशात त्रास कमी जाणवेल बघ” हेच तर मी सांगतोय की सर्वसामान्य भाषेत आपण म्हणतो ते हेच! पण गंमत अशी की प्रॅक्टिकली आपण ते मान्य करत नाही. तर हे मन जे सतत कार्यरत असते, विचारात असते त्याला आपण आपल्या न कळत त्रास देत असतो याची आपल्याला जाणीव आहे का? खरंतर घ्यायला हवी ती त्याची काळजी! पण त्याची गरज ही भासत नाही आणि कधी कोणी म्हणलेच की अरे जा एखाद्या मानसोपचारतज्ञ कडे जा तर त्या बोलण्याचा आपल्याला कमीपणा वाटतो आणि इतर कोणतेही दुखणे असेल ते मात्र आपण सहज मान्य करतो. आज दैनंदिनी जीवनात आपल्याला प्रत्येक वेळी गरज भासते ती मार्गदर्शनाची. कधी शिक्षणात, कधी व्यवसायात,कधी पर्सनल तर कधी आणखी कोणत्या प्रॉब्लेम मध्ये. आपण वेळोवेळी किंवा परिस्थितीनुसार म्हणा ना जर विचार केला माणसाची सायकोलॉजि त्याला खूप मदत करते. विचारांना एक दिशा असते, त्याची एक पद्धत असते आणि ती प्रत्येक व्यक्तीची ही वेगळी असते. ती विचारसरणी तुमचं भविष्य घडवते, तुमचे स्थान निर्माण करते आणि तुमच्या आयुष्याला दिशा देते.

म्हणजे जीवनाचा सगळं खेळच जो आहे तो तुमच्या मानसशास्त्रानुसार असतो. मन स्वस्थ तर सगळं स्वस्थ हीच सगळी यशस्वी जीवनाची खेळी! आयुष्याच्या या उपक्रमात तुमचा खरा मदतगार ठरू शकतो तो या क्षेत्रातील एक तज्ञ जी असतो तुमचा मार्गदर्शक गुरू! तो तुमच्या जीवनाचा शिल्पकार ठरू शकतो आणि एखाद्याच्या आयुष्याचा जादूगार सुद्धा! मित्रांनो आपले मन जाणा! आपल्या लोकांचे मन जाणा! त्या मनाला जाणून घ्या! त्याचे गरज भासेल तेव्हा भरपूर लाड पण करा आणि त्याची काळजी पण घ्या! माणूसशास्त्र हा शब्द अवघड वाटत असेल पण ते शास्त्र हे जीवनाचे सार शिकवते आणि अर्थ सुद्धा. आज मी एक किस्सा ऐकवतो, मी वाचलेल्या सत्य घटनांपैकीच आहे. माझा एक मित्र जो सतत व्यस्त असतो तो त्याच्या NGO सारख्या कामात. भरभरून आयुष्य जगलेल्या लोकांच्या पण आयुष्याच्या संध्याकाळी एकाकी असलेल्या वृद्धाश्रम या ठिकाणी मी एकदा त्याच्या सोबत गेलो.

तिथे बघितले की लोकं हसतात-बोलतात पण त्यांची ती काळजी जी एकाकीपणाची असते ती ते दाबून धरतात ती कुठेतरी दिसून येत होती….
जेव्हा माझ्या हे लक्षात आले की त्यांना यापुढे इथेच राहावे लागणार आहे तेव्हा मी त्यांना काही सांगायचे प्रयत्न केला…

“आता तुम्ही हेच बघा ना की नाण्याला दोन बाजू असतात. घरात एकत्र राहताना बरेचदा ग्रँटेड पकडून काही जवाबदारी थोपवल्या जातात मग ईच्छा असो अथवा नसो. त्यापेक्षा या ठिकाणी समवयस्क लोकांत आपल्या इच्छेप्रमाणे दिवस कंठणे सोपे नाही का? जबरदस्तीच्या जवाबदऱ्यांपेक्षा, लोकांच्या इच्छेविरुद्ध राहण्यापेक्षा किंवा कोणीच लक्ष द्यायला नाहीत असे जगण्यापेक्षा हे जगणे वाईट की चांगले”…. मी जेव्हा त्यांना असे विचारले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काही बदल दिसून आले.
माझा प्रयत्न एवढंच की आहे ज्या ठिकाणी ते आहेत त्या ठिकाणी आपण आनंदात जगावे हेच त्यांना जाणीव करून देणे! ह्या मनातील बदलाला तर मानसशास्त्र म्हणतात! जे निगेटिव्ह दिशेकडून पॉसिटीव्ह दिशेकडे वळवणे हेच तर यातील महत्वाचे बकाम! थोडक्यात काय तर तुम्हाला आनंद कशात हे दाखवून देणे आणि समजावून सांगणे! बघा, प्रयत्न करून स्वतःच्या मनाच्या शास्त्राचा अभ्यास करून..तुमच्या लक्षात येईल की, सगळ्यात मोठा विचार हा आपल्या बाबतीतला आपला ‘माणूसशास्त्राचा’ असतो, नाही का?

Leave A Comment

At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.

Rajyavahatuk society, Parvati Paytha, Pune, Maharashtra
(Sat - Thursday)
(10am - 05 pm)
Choose Demos Submit a Ticket Purchase Theme

Pre-Built Demos Collection

Consultio comes with a beautiful collection of modern, easily importable, and highly customizable demo layouts. Any of which can be installed via one click.

Cryptocurrency
Business Construction
Business Coach
Consulting
Immigration
Finance 2
Corporate 1
Corporate 2
Corporate 3
Consulting
Business 1
Business 2
Business 3
IT Solution
Tax Consulting
Human Resource
Life Coach
Marketing
Insurance
Finance RTL
Marketing
Consulting
Consulting